शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पुण्यातील भुसार व गूळ बाजार अखेर सोमवारपासून होणार सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 6:55 PM

संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला अन्नधान्य व अन्य किराणा मालाचा पुरवठा करणारा भुसार व गूळ बाजार बंद झाल्याने अन्नधान्य तुटवडा निर्माण होऊन गोंधळ होईल..

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश व बाजार समिती प्रशासनाकडून पूर्वतयारी व खबरदारीची हमी दि पूना मर्चंट चेंबरची शनिवारी बैठक 

पुणे : कोरोनाच्या धास्तीने मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी बंद केलेला भुसार व गूळ बाजार तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. तर व्यापाऱ्यांच्या मागणी नुसार संपूर्ण बाजार आवार निर्जुंतुकीकरण करणे, दररोज केवळ 100 वाहनांनच प्रवेश देणे, बाजार आवारात प्रवेश करणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे आदी विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिले आहे. यामुळे शनिवारी (दि.23) रोजी दि पूना मर्चंट चेंबरची बैठक घेऊन येत्या सोमवार पासून भुसार व गूळ बाजार पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. 

गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार व गूळ बाजारातील आठ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने व यामुळे एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याने बाजार आवारातील सर्वंच व्यापारी व अन्य बाजार घटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या धास्तीने व्यापाऱ्यांनी 19 मे पासून बाजार बंद ठेवला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला अन्नधान्य व अन्य किराणा मालाचा पुरवठा करणारा भुसार व गूळ बाजार बंद झाल्याने अन्नधान्य तुटवडा निर्माण होऊन गोंधळ होईल. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद ठेवता कामा नये, अशा स्पष्ट सूचना गेल्या आठवड्यात दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चेंबरचे पदाधिकारी, बाजार समिती प्रशासक यांची गुरूवारी बैठक घेतली. या बैठकीत बाजार तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. दरम्यान बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाची माहिती प्रशासक बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये संपूर्ण बाजार आवार निर्जुंतुकीकरण करण्यात आले असून , बाजार आवार व व्यापारी, बाजार घटकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचविण्यासाठी इतर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात दररोज केवळ 100 वाहनांनच प्रवेश देणे, बाजार आवारात प्रवेश करणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे, प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक करणे, भुसार व गूळ बाजार सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवणे, सुकामेवा बाजार 10 ते दुपारी 3 पर्यंत सुरू ठेवणे आदी निर्णय घेण्यात आले असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. ------ गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये सर्व व्यापार बंद असताना आम्ही सर्व धोका पत्करून बाजार सुरू ठेवला होता. परंतु आठ दिवसांपूर्वी मार्केटयार्डातील भूसार बाजारात कोरोनाची लागण होऊन एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन चेंबरने भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी कार्यकारणीची बैठक घेऊन येत्या सोमवारपासून ( ता.२५ मे) भूसार बाजार पुन्हा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार आहोत - पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष दि पूना मर्चंट चेंबर

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डAjit Pawarअजित पवारNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस