Pune: तरुणी अंघोळ करताना शेजारील अल्पवयीन मुलाने केला व्हिडिओ शूट, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 20:24 IST2023-09-15T20:23:08+5:302023-09-15T20:24:46+5:30
अल्पवयीन मुलाविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल...

Pune: तरुणी अंघोळ करताना शेजारील अल्पवयीन मुलाने केला व्हिडिओ शूट, गुन्हा दाखल
नसरापूर (पुणे) : सोसायटीतील शेजारी राहत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अंघोळ करताना मोबाइलवर चित्रीकरण करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नसरापूर (ता. भोर) जवळील एका शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या दोन तरुणी येथील एका सोसायटीत भाड्याने राहतात. गुरुवारी (दि. १४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यामधील एक तरुणी स्नानगृहात अंघोळ करत असताना शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलाने त्यांच्या नकळत खिडकीच्या फटीतून मोबाइलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना संबंधित तरुणीच्या लक्षात आले.
याबाबत या मुलीने व तिच्या मैत्रिणीने इमारतीतील इतरांना माहिती देऊन या मुलाला पकडून राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलाने पोलिसांना कबुली दिली असून पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सागर कोंढाळकर तपास करीत आहेत.