शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:49 IST

कोथरूड आणि गुन्हेगारी आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते आहेत

पुणे: पुण्यात गुन्हेगारी वाढत असून भरदिवसा खून, दरोडा, तोडफोड करून दहशत अशा घटना घडू लागल्या आहेत. कुख्यात गुंड आंदेकर, घायवळ, मारणे यांच्या टोळीतील गुंडांकडून दहशत पसरवली जात आहे. पुणेकर सद्यस्थितीत जीव मुठीत धरूनच घराबाहेर पडू लागले आहेत. गुंडांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्यचे दिसून येत आहे. आजच सकाळी कोथरूडमध्ये बंदूक घेऊन २ तरुण फिरत असल्याचे सीसीटीव्हीतून दिसून आले आहे. मागील काही दिवसांपुर्वी घायवळच्या गुंडांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता. कोथरूडमध्ये वारंवार या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं आणि तिथं एवढे चंद्रकांतदादा कोथरूडमध्ये करतात काय? असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला आहे.  

धंगेकर म्हणाले, निलेश हा भारत सोडून पळून गेलेला आहे. त्याला पासपोर्ट कोणी दिला हा महत्वाचा प्रश्न आहे.  ज्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट दिला त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याला कुठल्या नेत्यांनी शिफारस दिली त्याची चौकशी झाली पाहिजे. जर गृहखात्याने मनापासनं काम करायचं ठरवलं. जर विरोधक कसं आपण विरोधकाला कसं करतो. त्या पद्धतीनं जर याची चौकशी झाली तर याच्यामध्ये ज्या ज्या राज्यकर्त्यांनी निलेश घायवळला पाठिंबा दिलाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज आपण बघितलं कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं आणि तिथं एवढे चंद्रकांतदादा म्हणून करतात काय? आमच्या सर्वसामान्य लोकांवर अटॅक करतात. तर गुन्हेगारांला का पाठीशी घालतात? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. आता कळलं की, आज सकाळी कोथरूडमध्ये दोन गुन्हेगार बंदूक घेऊन जाताना सिसिटीव्ही समोर आला आहे. म्हणजे कोथरूड आणि गुन्हेगारी आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kothrud crime surge: Dhangar questions Chandrakant Patil's inaction amid violence.

Web Summary : Ravindra Dhangar criticizes Chandrakant Patil over rising crime in Kothrud, Pune. Gang violence and shootings are creating fear. Dhangar questions Patil's role and accuses politicians of supporting criminals, demanding investigation into Nilesh Ghaywal's escape and accomplices.
टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरchandrahar patilचंद्रहार पाटीलPoliticsराजकारणPune Crimeपुणे क्राईम बातम्या