Pune | पुण्यात ससून रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:25 IST2023-03-29T11:23:56+5:302023-03-29T11:25:21+5:30

बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल...

female doctor jumped from the third floor of Sassoon Hospital in Pune | Pune | पुण्यात ससून रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी

Pune | पुण्यात ससून रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने खाली मारली उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत. बुधवारी (२९ मार्च) सकाळाच्या सुमारास हा प्रकार ससून रुग्णालयाच्या आवारात घडला. इमारतीवरून उडी मारलेल्या विद्यार्थिनीचे नाव आदिती दलभंजन आहे. बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती.

इमारतीवरून उडी मारलेल्या विद्यार्थिनीची ओळख पटली असून ती एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनीने नेमकी उडी का मारली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: female doctor jumped from the third floor of Sassoon Hospital in Pune