खेळताना पडला; विळा मानेत घुसला, दीड वर्षीय चिमुकल्यावर तत्परतेने उपचार, बारामतीच्या डाॅक्टरांनी दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:09 IST2025-04-07T15:08:46+5:302025-04-07T15:09:27+5:30
खेळता खेळता विळ्यावर पडलेल्या गंभीर बालकाला मानेत घुसलेल्या विळ्यासकट पालकांनी क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरकडे आणले होते

खेळताना पडला; विळा मानेत घुसला, दीड वर्षीय चिमुकल्यावर तत्परतेने उपचार, बारामतीच्या डाॅक्टरांनी दिले जीवदान
बारामती: खेळता खेळता विळ्यावर पडल्याने दीड वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे घडली. यावेळी मानेमध्ये घुसलेला विळा डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करत अतिशय कौशल्याने मानेतून काढत त्याला जीवदान दिले. रविवारी दुपारी हि घटना घडली.
खेळता खेळता विळ्यावर पडलेल्या गंभीर बालकाला मानेत घुसलेल्या विळ्यासकट बरोबर घेतले. तसेच त्याच्या पालकांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र मुथा व सौरभ मुथा यांच्या श्रीपाल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. डाॅ.मुथा यांनी परिस्थितीचे गांंभीर्य ओळखत बालकाला रुग्णालयात दाखल केले. तसेच आवश्यक तपासण्या करीत प्राथमिक उपचार सुरु केला. डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, डॉ. श्रीपाद पाटणकर, यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कबीरवर ताबडतोब उपचार सुरू केले. बालकाला भूल देवून त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. वेळेवर उपचार झाल्याने बालकाच्या जीवावरील धोका टळला. त्यानंतर अया विळ्याचे आणखी थोडे टोक किंचितसे आत घुसले असता ते मज्जारज्जूंना, स्पायनल काॅर्ड रक्तवाहिन्यांना धक्का लागून ते बाळाच्या जीवावर बेतण्याचा धोका होता. रामनवमीच्या दिवशी आमच्या बाळाच्या जीवनात डॉक्टरांच्या रूपाने रामच धावून आला अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. अथक प्रयत्न करत डाॅक्टरांनी त्याच्यावर उपचार करत त्याला जीवदान दिले आहे. याबाबत डाॅ.साैरभ मुथा यांनी लहान मुलांना धारदार शस्त्रापासून दुर ठेवण्यासाठी पालकांनी दक्षता घ्यावी. धारदार हत्यारे मुलांच्या हाती येणार नाहीत अशा पध्दतीने दुर ठेवावीत असे आवाहन केले आहे.