वारंवार देण्यात येणाऱ्या धमकीला कंटाळून एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 18:09 IST2021-10-05T18:08:37+5:302021-10-05T18:09:24+5:30

सुरुवातीला २ लाख ७० हजार असे एकूण तीन लाख वीस हजार रुपये ट्रान्सफर केले

Fed up with repeated threats, one commits suicide | वारंवार देण्यात येणाऱ्या धमकीला कंटाळून एकाची आत्महत्या

वारंवार देण्यात येणाऱ्या धमकीला कंटाळून एकाची आत्महत्या

मार्गासनी: आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल निवी येथील एका इसमास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.      

याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले की निवी येथील सुरेश बाळु जोगडे (वय ५१) यांनी दिनांक १९ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्यांचा मुलगा संतोष सुरेश जोगडे( वय २५) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिलेली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की निवी येथील दत्ता दगडू गोरे यांनी सुरेश यांच्या कडून रोख ५० हजार आणि त्यांच्या खात्या वरून एन एफ टी द्वारे २ लाख ७० हजार असे एकूण तीन लाख वीस हजार रुपये ट्रान्सफर केले. वारंवार मागणी करून देखील हे पैसे परत दिले नाहीत. दत्ता गोरे यांच्या कडून वारंवार धमकी देण्यात येत होती. या गोष्टीस कंटाळून सुरेश जोगडे यांनी आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्ता दगडू गोरे यांना अटक केलेली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस हवालदार कदम अभय बर्गे तपास करीत आहेत. 

Web Title: Fed up with repeated threats, one commits suicide