Pune: मुलीच्या वाढदिवसासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या वडिलांना कर्मचाऱ्याकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 12:25 PM2022-01-01T12:25:05+5:302022-01-01T12:26:40+5:30

वाढदिवस साजरा केल्यानंतर व सर्व पाहुणे गेल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत जेवण करीत होते...

father who went hotel for his daughters birthday was beaten by an employee kothrud crime | Pune: मुलीच्या वाढदिवसासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या वडिलांना कर्मचाऱ्याकडून मारहाण

Pune: मुलीच्या वाढदिवसासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या वडिलांना कर्मचाऱ्याकडून मारहाण

Next

पुणे : मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या वडिलांना व त्यांच्या मित्रांना हॉटेल मॅनेजर व इतर कामगारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पालकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल स्पाईस गार्डनचे मॅनेजर विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर हॉटेलमधील १३ ते १५ कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना किष्किंदानगर येथील हॉटेल स्पाईस गार्डनमध्ये २५ डिसेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल स्पाईस गार्डन येथे गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर व सर्व पाहुणे गेल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत जेवण करीत होते. त्यावेळी हॉटेलचा मॅनेजर विनय शेट्टी तेथे आला व त्याने फिर्यादीकडे बघून खूप उशीर झाला, यांचे जेवण कधी होणार, पैसे देणार की नाही, असे फिर्यादी यांना टोमणे मारले. फिर्यादी यांचे जेवण झाल्यावर त्यांनी गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर केले. परंतु पैसे ट्रान्सफर न झाल्याने विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर कामगारांनी फिर्यादी यांना फुकटे आहेत, असे म्हणून त्यांना व त्यांच्या दोघा मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधून बाहेर हाकलून दिले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: father who went hotel for his daughters birthday was beaten by an employee kothrud crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.