घरात नग्न अवस्थेत फिरणाऱ्या पित्याने दिले मुलीला चटके, चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 12:17 IST2024-04-20T12:15:48+5:302024-04-20T12:17:29+5:30

चंदननगर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला...

Father walking around naked in the house hit the girl, a crime was registered in the Chandannagar police station | घरात नग्न अवस्थेत फिरणाऱ्या पित्याने दिले मुलीला चटके, चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

घरात नग्न अवस्थेत फिरणाऱ्या पित्याने दिले मुलीला चटके, चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : आपल्या अल्पवयीन मुलींसमोर नग्न अवस्थेत फिरणाऱ्या, नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिच्या पायाला चटके देणाऱ्या पित्याविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३६ वर्षांच्या पतीविरोधात पत्नीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२० पासून १८ एप्रिल २०२४ दरम्यान सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी ही आरोपीची पत्नी आहे. तर त्यांना ९ वर्षांची मुलगी आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत आरोपी हा दिवसरात्र सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत घरात फिरत असे. तसेच, मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार त्याने केला. मुलीला मारहाण करून त्याने तिच्या पायाला चटकेदेखील दिल्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Father walking around naked in the house hit the girl, a crime was registered in the Chandannagar police station