२ लाख रुपयांसाठी नराधम बापाचीच अल्पवयीन मुलीवर लग्न करण्याची जबरदस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:49 IST2022-06-02T15:48:35+5:302022-06-02T15:49:30+5:30
५४ वर्षाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल...

२ लाख रुपयांसाठी नराधम बापाचीच अल्पवयीन मुलीवर लग्न करण्याची जबरदस्ती
पुणे : वर्षाच्या मुलीला प्रलोभन दाखवून वडिल आपल्याबरोबर औरंगाबादला घेऊन गेले. तेथे मुलाकडून २ लाख व दुचाकी घेऊन आपल्याच अल्पवयीन मुलीचा बापच लग्न लावून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ५४ वर्षाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ५४ वर्षाच्या अनिसबरोबर विवाह झाला होता. त्यांना एक १७ वर्षाची मुलगी आहे. तिचा विवाह करण्याच्या उद्देशाने त्याने तिला प्रलोभने दाखवून ऑगस्ट २०१७ मध्ये औरंगाबाद येथे घेऊन गेला. तिचे औरंगाबाद येथील एका सादिक नावाच्या तरुणाबरोबर लग्न करण्याची जबरदस्ती केली. त्याबदल्यात त्याने सादिक याच्याकडून २ लाख रुपये व दुचाकी घेतली.
मुलीने या लग्नाला विरोध केल्यावर तिला त्याने मारहाण केली. ही मुलगी संधी साधून आपल्या आईकडे पुण्यात परत आली. तिने आपल्या आईला घडलेली हकिकत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.