सासऱ्याची 32 वर्षीय सुनेकडे शरीर सुखाची मागणी; पतीनेही इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:42 IST2022-07-18T13:34:34+5:302022-07-18T13:42:33+5:30

सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर पती सासू-सासरे ननंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Father in law 32 year old daughter in law demand for body pleasure The husband also had an unnatural relationship against his will | सासऱ्याची 32 वर्षीय सुनेकडे शरीर सुखाची मागणी; पतीनेही इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक संबंध

सासऱ्याची 32 वर्षीय सुनेकडे शरीर सुखाची मागणी; पतीनेही इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक संबंध

पुणे : पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशासाठी आणि इतर कारणासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून सासर्‍यानेच सुनेकडे शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर पती सासू-सासरे ननंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  महिला ही लग्न झाल्यानंतर मोहम्मद वाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत पती आणि सासू सासऱ्यांसोबत सोबत राहत होती. यावेळी आरोपी पती आणि इतरांनी पैशासाठी आणि इतर कारणासाठी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने तर तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवले. तर 63 वर्षीय सासर्‍याने फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे वागून घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्याकडे शरीर सुखाचे मागणी केली. दरम्यान त्रास असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Father in law 32 year old daughter in law demand for body pleasure The husband also had an unnatural relationship against his will