ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य

By Admin | Updated: May 27, 2014 06:49 IST2014-05-27T06:49:34+5:302014-05-27T06:49:34+5:30

राष्ट्रपती भवनासारख्या ऐतिहासिक इमारतीसमोर सार्क देशातील अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत झालेला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरला़

The fate of being a historic moment | ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य

पुणे : ‘राष्ट्रपती भवनासारख्या ऐतिहासिक इमारतीसमोर सार्क देशातील अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत झालेला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी हा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरला़ अशा या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मला लाभली हे मी माझे भाग्यच समजतो,’ अशा शब्दांत सिटी कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला देशपांडे उपस्थित होते़ कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या भावना ‘लोकमत’ जवळ व्यक्त केल्या़ ते म्हणाले, ‘अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती़ राष्ट्रपती भवनाच्या ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर देश-परदेशांतील हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत अगदी भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम झाला़ सगळे वातावरण भारावून टाकणारे होते़ भारताच्या पंतप्रधानाच्या शपथविधी समारंभाला इतक्या मोठ्या संख्येने शेजारी देशांतील राष्ट्रप्रमुख उपस्थित राहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता़ देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, उद्योगपती उपस्थित होते़ पुण्यातील अनेक जण तसेच देशभरातील उद्योजक, खासदार यांच्याशी भेट झाली़ अगदी भारावून टाकणारा असा हा कार्यक्रम होता़ (प्रतिनिधी)

Web Title: The fate of being a historic moment