भिगवण : बारामती–भिगवण रोडवरील पिंपळे गाव हद्दीत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. ऊसाची वाहतूक करणारा ट्रक आणि ऊस खाली करून परतणारा ट्रॅक्टर यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागली. आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला.अपघातात मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाची ओळख अमोल राजू कुराडे (रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी झाली आहे. पिंपळे पाटी परिसरात ऊसाचा मोकळा ट्रॅक्टर आणि ऊस भरलेला ट्रक (क्रमांक एम.एच. 11 एल 1341) यांच्यात अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ, भिगवण पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि दोन फायर ब्रिगेड पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. आगीमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
Web Summary : A truck and tractor collided near Pimple, Baramati-Bhigan road. Both vehicles caught fire, killing the tractor driver, Amol Kurade, instantly. Firefighters extinguished the blaze, halting traffic. Police are investigating.
Web Summary : बारामती-भिगवन मार्ग पर पिंपल के पास ट्रक और ट्रैक्टर की टक्कर हो गई। दोनों वाहनों में आग लग गई, जिससे ट्रैक्टर चालक अमोल कुराडे की मौके पर ही मौत हो गई। दमकल कर्मियों ने आग बुझाई, यातायात बाधित। पुलिस जांच कर रही है।