उंड्री ते हांडेवाडी रस्त्यावर भीषण अपघात, टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 20:38 IST2023-09-15T20:37:48+5:302023-09-15T20:38:17+5:30
हा अपघात उंड्री ते हांडेवाडी रस्त्यावर घडला...

उंड्री ते हांडेवाडी रस्त्यावर भीषण अपघात, टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
पुणे : भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. हा अपघात उंड्री ते हांडेवाडी रस्त्यावर घडला. वनलालपेका रोल्हनेमा एन. (वय २५) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी एलवर्ड चिंझा लालापुया (२४, रा. शिवनेरीनगर) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, एडवर्ड आणि त्यांचे सहकारी वनलालपेका हे १३ सप्टेंबर रोजी उंड्री येथून दुचाकीवर जात होते. त्यावेळी भरधाव टँकरची दुचाकीला धडक बसली. त्यात गंभीररित्या जखमी झाल्याने वनलालपेका यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार झालेल्या टँकर चालकाचा पोलिस शोध घेत असून, उपनिरीक्षक विजय वगरे अधिक तपास करीत आहेत.