Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 09:00 IST2023-10-26T08:59:15+5:302023-10-26T09:00:21+5:30
पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये दोन मृत्यू तर पंधरा जखमी झाले आहेत....

Pune: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १५ जण जखमी
पाटस (पुणे) : पाटस हद्दीतील घाट परिसरात टायर फुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या सिमेंटच्या ट्रकला (क्रमांक एम एच १२ यु एम २८५४) भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी बसने (क्रमांक एम एच ०९ सी व्ही ४५९७) जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये दोन मृत्यू तर पंधरा जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी पाटस व दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. खाजगी बस लातूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. अतिवेगामुळे बसच्या पुढील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. पहाटेच्या झोपेच्या वेळेस हा अपघात झाल्याने यामध्ये प्रवाशी बेसावध होते त्यामुळे जखमींची संख्या जास्त आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमीक माहिती मिळत आहे.