पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात; एकावर एक सहा कार धडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 19:17 IST2022-09-10T19:16:39+5:302022-09-10T19:17:23+5:30
एका कार चालकाने जाग्यावरच ब्रेक मारल्याने....

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात; एकावर एक सहा कार धडकल्या
नीरा (पुणे) : अरुंद पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील नीरानजीकच्या पिंपरे (खुर्द) येथे नीरा डाव्या कालव्याशेजारी एका कार चालकाने जाग्यावरच ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या पाच ते सहा गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्या. या अपघाताचे कोणीही जखमी झाले असून, वाहनांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी (दि. १०) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणे बाजूकडून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सहा चारचाकी गाड्या एका पाठोपाठ एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कोण कोणाला धडकले हे कोणालाच समजले नसल्याने त्या ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक काळ भांडणे सुरू असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.