पुणे: मांजरी-यवत रस्त्यावर भीषण अपघात; पत्नी मृत्युमुखी, पती गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 21:25 IST2022-07-22T21:23:08+5:302022-07-22T21:25:01+5:30
या अपघातात पती गंभीर जखमी...

पुणे: मांजरी-यवत रस्त्यावर भीषण अपघात; पत्नी मृत्युमुखी, पती गंभीर जखमी
लोणी काळभोर (पुणे) : दुचाकी वरून चाललेल्या पती-पत्नीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी मृत्युमुखी पडली आहे, तर पती गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात लक्ष्मी वाल्मिक देवकुळे (वय ४६, रा.गोडबोले वस्ती, मोमिननगर, मांजरी, ता.हवेली) या मृत्युमुखी पडल्या आहेत, तर पती वाल्मिक देवकुळे हे गंभीर जखमी झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे पती-पत्नी आपल्या दुचाकीवरून मांजरी येथून यवत येथे जात होते.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते पुणेसोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता.हवेली) येथील दुकानासमोर आले. त्यावेळी मागील बाजूने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामुळे दोघेही रस्त्यावर पडले.
अपघातात लक्ष्मी देवकुळे यांचे डोक्यास गंभीर जखमा झाल्या. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून, त्या मयत झाल्या असल्याचे जाहीर केले.