पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि पीएमपी बसचा भीषण अपघात; दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 11:49 IST2022-07-28T11:44:58+5:302022-07-28T11:49:06+5:30

महामार्गावर काही वेळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी...

Fatal accident involving truck and PMP bus on Mumbai-Bengaluru highway; Two injured near chandani chauk | पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि पीएमपी बसचा भीषण अपघात; दोन जखमी

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि पीएमपी बसचा भीषण अपघात; दोन जखमी

पुणे: मुंबई- बंगळुरू महामार्गावर चांदणी चौक येथे गुरुवारी सकाळी बसच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक व पीएमपी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

या अपघातात ट्रकचालक व पीएमपी बसमधील प्रवासी जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजता घडला. दरम्यान, या अपघातामुळे चांदणी चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

महामार्गावर चांदणी चौक येथील प्रथमेश एलाईट या इमारतीसमोर वारजेच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न ट्रक करीत होता. त्यावेळी ट्रक बसला घासत थेट दुभाजकावर चढला. ही घटना सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक तसेच बस मधील प्रवासी जखमी झाला

Web Title: Fatal accident involving truck and PMP bus on Mumbai-Bengaluru highway; Two injured near chandani chauk