Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:59 IST2022-10-04T15:57:33+5:302022-10-04T15:59:34+5:30
मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस त्याबद्दल चौकशी करत आहेत...

Pune : कात्रज चौकात भीषण अपघात; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू
कात्रज (पुणे): कात्रज चौकात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांची सांगितले. ही घटना आज दुपारी तीनच्या दरम्यान घडलेली आहे. मृत्यू झालेल्या इसमाची ओळख पटलेली नसून पोलीस त्याबद्दल चौकशी करत आहेत.
अपघात झालेल्या घटनास्थळाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी रस्ता निमुळता आहे. त्याचबरोबर या भागात अवजड वाहनांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात आहे. सातारा रोड, खडीमशीन चौक, पुणे- बेंगलोर हायवे अशा ठिकाणी जाण्यासाठी कात्रज चौकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. गेल्या काही दिवसांपासून कात्रज चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून तासंतास वाहनांच्या रांगा असतात.