पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोल नाक्यावर भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:13 IST2023-07-27T15:11:57+5:302023-07-27T15:13:22+5:30
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली...

पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोल नाक्यावर भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी
राजगुरुनगर (पुणे) :पुणेनाशिक महामार्गावर चांडोली टोल दोन नाक्याजवळ बंद पडलेल्या कंटेनरला आयशर टेम्पो धडकून जोरदार अपघात झाला. ही घटना (दि. २७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ओंकार सावंत आणि गणेश दांगट गंभीर जखमीची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर शहराच्या लगत चांडोली टोल नाक्याजवळ बंद पडलेल्या कंटेनरला दोन आयशर टेम्पो धडकून जोरदार अपघात झाला. दुध वाहतूक करणारे दोन्ही आयशर टेम्पो पुण्याकडून राजगुरूनगर बाजूकडे येत होते. टोल नाक्याजवळ रस्त्यात बंद पडलेल्या कंटेनरवर पहिला टेम्पो धडकला. त्यानंतर मागून येणारा कंटेनरही त्यावर आदळला.
अपघातात चालक गंभीर जखमी होऊन वाहनांचे नुकसान झाले. रस्त्यात अपघात होऊन जागेवरच वाहने दोन्ही वाहने अडकून पडल्यामुळे सकाळी सहापासून महामार्गावर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चांडोली टोल नाका ते शिरोली परिसरात एका बाजूने ट्रॅफिक जॅम झाले होते. प्रवासी, वाहनचालक यांना जवळपास दोन तास जागेवरच वाहने उभी करावी लागली. वाहतुक पोलिस संतोष शिंदे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरळीत केली.