शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कृषी विभाग खरिपासाठी सज्ज

By admin | Updated: May 20, 2015 23:09 IST

जिल्हा प्रशासनाने आदेश देताच खरीप हंगामाच्या नियोजनास तालुक्यांतील कृषी विभाग व शेतकरी तयारीसाठी सज्ज झाला आहे.

जिल्हा प्रशासनाने आदेश देताच खरीप हंगामाच्या नियोजनास तालुक्यांतील कृषी विभाग व शेतकरी तयारीसाठी सज्ज झाला आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर पोहोचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घोंगडी बैठका सुरू झाल्या आहेत. पूर्वमशागत उरकण्यासाठी शेतकऱ्यांचीही लगबग दिसू लागली आहे. योग्य नियोजन करून शेतीमधून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खत मिळणार बांधावर ४शेतकऱ्यांनी गटशेती करावी यासाठी शासनाकडून या वर्षीही बांधावर खतपुरवठ्याची योजना राबविली आहे. गटातील शेतकऱ्यांनी दहा टन खताची एकत्रित मागणी केल्यास शासकीय खर्चातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत खतांच्या गोणी पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी गटाने एमएआयडीसी या नावाने डिमांड ड्राफ्ट काढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वैयक्तिकरीत्या खते व बियाणे नजीकच्या शासनमान्य खते व बियाणेविक्री दुकानात (कृषिसेवा केंद्रात) शासकीय अनुदानाच्या दरातच मिळतील. त्यासाठीची मागणी नोंदणी सुरू आहे. आवश्यक जादाचे बियाणे लवकरच उपलब्ध होणार असल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे.तालुकानिहाय बैठका२१ मे : हवेली, पुरंदर, २२ मे : मुळशी, मावळ, २६ मे- वेल्हा, भोर, २७ मे : शिरुर, खेड, २८ मे : आंबेगाव, जुन्नर, २९ मे : बारामती, इंदापूर आणि ३० मे : दौंड.खतमागणी (टन)युरिया७१२६५एम.ओ.पी१२५0६एस.एस.पी२0६0२१५.१५.१५ ४६७४२०.२०.२०७१0२१२.३२.१६५८६११८.४६.०0२0४७४१०.२६.२६१८६६८एकूण१८0000२0१४-१५ चे साध्यगेल्यावर्षी २ लाख ९८ हजार ८00 हेक्टरवर नियोजन केले होते. यात १३,४0७३ हेक्टरवर पेरणे करण्यात आली होती. त्याची टक्केवाररी ५८ टक्के होती. ४मका : ४३ टक्के वाढ ४सायाबीन: ३१३ टक्के वाढयंदा भाताचे क्षेत्र वाढणार जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा भाताचे ११ हजार ७५३ हेक्टर क्षेत्र वाढणार आहे. गेल्या वर्षी ५५,५३१ हेक्टवर भातलागवड केली होती. यंदा ६७ हजार २८४ हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ६२ हजार ३00 हेक्टर क्षेत्र हे भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. त्याची सरासरी १५५0 किलो उत्पादकता असते. गेल्या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच भातउत्पादकांची निराशा केली होती. वर्षभर विविध रोगांचा सामना करीत कसेबसे पीक जगवले होते. शेवटी भरलेला दाणाही अवकाळी पावसाने शेतातच पडून गेला होता. त्यामुळे ५५ हजार ५३१ हेक्टरवर लागवड होऊन ९५ हजार ४४७ मे.टन उत्पादन मिळाले होते. मात्र त्याची सरासरीपेक्षा उत्पादकता जास्त म्हणजे १७१९ किलो (हेक्टरला) होती. यंदा ६७ हजार २८४ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन असून यातून १ लाख २१ हजार ४३0 मे. टन उत्पादन घेण्याचे नियोजन आहे.