शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज, एका वृद्ध महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 19:29 IST

आंदोलने उपोषणे करूनही प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली

पुणे : पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून २ हजार ६७३ हेक्टर इतके भूसंपादन करण्यात येणार आहे. याविरोधात सात गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सात गावांत होणाऱ्या भूसंपादनापैकी एखतपूर या गावातील जमिनींच्या संपादनासाठीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणाला ग्रामस्थांना विरोध दर्शवीत काल ड्रोनच फोडल्याचे समोर आले आहे. तर आज जमिनी मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यासाठी ग्रामस्थांनी अडवणूक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. अंजनाबाई कामठे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. 

ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी थांबवावी, अन्यथा शेतकरी आपले जीवन थांबवतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र कालपासून ड्रोन सर्वेक्षण सुरु झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज आलेल्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी पोलिसांकडून आमच्यावर लाठीचार्ज झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे. याआधी अनेक आंदोलने उपोषणे करूनही प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.   

ग्रामस्थांनी ड्रोन फोडले 

विमानतळासाठीपुरंदर तालुक्यातील सात गावांपैकी एखतपूर या गावांत शुक्रवारी ड्रोन सर्व्हेला सुरुवात झाली होती. मात्र, ड्रोन सर्वेक्षण सुरू होत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमावाने ड्रोन फोडले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन दुपारी चार वाजेनंतर आणखी दोन ड्रोन कॅमेरे मागवून घेतले. त्याद्वारे पुन्हा ड्रोन सर्वेक्षण सुरू करून सायंकाळी ते सर्वेक्षण पूर्ण करण्यात आला. शेतकऱ्यांनी ड्रोन कॅमेरा फोडल्याने त्यांच्याविरोधात पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती.  

हजारो लोकांचे संस्कार उद्ध्वस्त होणार 

पुरंदर विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतावरून होईल. शेतकरी विमानतळाला जमीन देणार नाहीत, हा आमचा निर्धार आहे. हा निर्धार पक्का असून, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या विमानतळामुळे हजारो लोकांचे संस्कार उद्ध्वस्त होणार आहेत. जिल्ह्यात अनेक जागा उपलब्ध असून, तिथे विमानतळ करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.  

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारagitationआंदोलन