शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात धरणग्रस्ताचा आत्मदहनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:44 IST

दौंड तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्याने संध्याकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर उतरुन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देयाप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी धुमाळ यांना ताब्यात घेउन केला गुन्हा दाखल

पुणे: दौंड तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्याने संध्याकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर उतरुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. धनाजी गेनबा धुमाळ वय ७७ हे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना यावेळी बाहेर खेचुन प्रसंग टाळला. दरम्यान, याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी धुमाळ यांना ताब्यात घेउन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१९५८ साली धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यात धुमाळ यांचा देखील समावेश आहे. शेतकऱ्यांचे दौंड तालुक्यातील सोनवडी या गावी त्यांचे १९६१ साली पुनर्वसन करण्यात आले. त्यांना निवासासाठी देण्यात आलेले भूखंड आजतागायत २९ धरणग्रस्तांच्या नावावर झालेले नाहीत. धरणग्रस्तांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवण्यासाठी धुमाळ ३० वर्षापासुन प्रयत्न करत आहेत. सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देखील आवश्यक कार्यवाही होत नसल्यामुळे धुमाळ उद्विग्न झाले होते...धुमाळ म्हणाले ,धरणग्रस्तांच्या वर्ग एकच्या जमिनी संपादित केल्या व देताना वर्ग दोनच्या देण्यात आल्या. अनेकांनी धरणग्रस्तांच्या जागेत अतिक्रमण केले आहे. न्याय मिळण्यासाठी ३० वर्षापासुन माझे प्रयत्न सुरु आहेत. सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देखील आवश्यक कार्यवाही होत नाही. या प्रकरणातील २९ धरणग्रस्तांपैकी २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी किती वर्ष लागणार हे काम होण्याला असा प्रश्न उपस्थित होत आहे .        धुमाळ यांची बातमी समजताच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, प. महाराष्ट्र विभाग प्रमुख अनिल चव्हाण,  प. महाराष्ट्र युवा आ. प्रमुख अभिमन्यू शेलार .महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सीमा नरोडे, जिल्हाध्यक्ष शरद गद्रे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रांजणे,बाबा पडवळ, निखिल सेवकरी, योगेश गायकवाड, पंकज गायकवाड, हमीद सय्यद आदी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात  दाखल झाले. अध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याने दौंड तहसिलदारांना फोन करुन उद्या सर्व दप्तर व संबंधित कर्मचाऱ्यांसह पुणे पुनर्वसन कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. उद्याच धुमाळ यांची सर्व काम करुन देण्याचे आश्वासन दिले.          दरम्यान, बंडगार्डन पोलिसांनी धुमाळ यांना ताब्यात घेउन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीDamधरणPoliceपोलिस