उंडवडि सुपे येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 20:44 IST2023-04-04T20:43:35+5:302023-04-04T20:44:09+5:30

या घटनेनंतर  उंडवडी सुपे येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत.

Farmer dies due to electric shock in Undavadi Supe | उंडवडि सुपे येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

उंडवडि सुपे येथे विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

बारामती - बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय मुरलीधर गवळी असे या घटनेत म्रुत्युमुखी पडलेल्या  शेतक-याचे नाव आहे.महावितरणच्या गलथानमुळे हि घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी ही घटना घडली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार,  महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील शेतकरी विजय गवळी यांना विद्युत खांबावर चढता येत असल्याने त्यांना दुरुस्ती करण्यास सांगितले. परंतु याच दरम्यान खांबावर चढलेल्या गवळी यांना  विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर  उंडवडी सुपे येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी  जोपर्यंत महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे . संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत ,तसेच  नातेवाईकांना मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

Web Title: Farmer dies due to electric shock in Undavadi Supe