शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून ५ ते ६ जणांकडून दरोडा; पती-पत्नी जखमी, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 15:12 IST

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सासू व पती - पत्नी गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले

शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. मात्र घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दरोडेखोरांच्या हल्ल्यात सासू व पती - पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून चाकण पोलिसांकडून युद्ध पातळीवर तपास सुरू आहे.        दरोडेखोरांच्या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर (वय ६५), अशोक जयराम वाडेकर (वय ३५) व उज्वला अशोक वाडेकर (वय ३२, सर्व रा. बहुळ) जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. २४) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बहुळ गावच्या हद्दीतील फुल सुंदरवस्ती परिसरात घडली. याप्रकरणी जयराम लक्ष्मण वाडेकर (वय ६७) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

 चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरात मध्यरात्री पाच - सहा चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला. मात्र झोपेत असलेले फिर्यादी जयराम वाडेकर यांना अचानक पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने जाग आली असता, २० ते २५ वयोगटातील जाडसर, सावळ्या वर्णाचा एक चोरटा हातात धारदार चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता. "गप्प राहा, नाहीतर चाकू भोसकतो!" अशी धमकी देत त्याने त्यांना जागेवरून हलण्यास मज्जाव केला. दरम्यान, इतर दोन चोरटे खोलीतील कपाटे आणि पेट्या फोडत होते. हॉलमध्ये झोपलेल्या शालन वाडेकर यांनी आवाज ऐकून घाबरत चोरट्यांना "काय घ्यायचे ते घ्या, पण आम्हाला मारू नका!" अशी विनवणी केली. मात्र, तरीही चोरट्यांनी हात उचलत त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले.

दरम्यान जयराम आणि शालन यांचा ऐवज काढून घेतल्यानंतर चोरटे शांत बसले नाहीत. त्यांनी अशोक आणि उज्वला यांच्या बेडरूमचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने तोडला. अचानक दरवाजा उघडल्याने अशोक आणि उज्वला जागे झाले. प्रतिकार करताच, चोरट्यांनी दोघांच्या पोटात थेट चाकू भोसकला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी शालन वाडेकर यांनी मुलाला व सूनेला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र, चोरट्यांपैकी एकाने त्यांना काठीने मारहाण केली. चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. हल्ल्यानंतर चोरट्यांनी घराची बाहेरून कडी लावून पळ काढला. घटनास्थळी आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चाकण पोलीसांनी भेट घेऊन पाहणी केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक नाथा घार्गे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाhusband and wifeपती- जोडीदारHomeसुंदर गृहनियोजन