शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची बोगस कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 7:25 PM

पुणे : राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना दि. १ जुलै २०१२ पासून राबविली जाते.जालना व अमरावती जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या नावाने बोगस कार्डचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे या योजनेअंतर्गत रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत सुमारे ९७१ प्रकारच्या विविध आजारांमोफत उपचार केले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ शिधापत्रिका व कोणतेही छायाचित्र असलेले शासनमान्य ओळखपत्र आवश्यक असते. 

पुणे : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाने बोगस कार्ड छापून नागरिकांना त्याचे वितरण केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कार्डसाठी नागरिकांकडून पैसे वसुल केल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे कार्ड दिले जात नसल्याने अशा बोगस व अनधिकृत कार्डपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांनी केले आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना दि. १ जुलै २०१२ पासून राबविली जाते. पूर्वी या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होते. या योजनेचा लाभ केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारक कुटुंबियांना मिळतो. योजनेअंतर्गत रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत सुमारे ९७१ प्रकारच्या विविध आजारांमोफत उपचार केले जातात. या योजनेसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कार्ड किंवा ओळखपत्र दिले जात नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ शिधापत्रिका व कोणतेही छायाचित्र असलेले शासनमान्य ओळखपत्र आवश्यक असते. मात्र, जालना व अमरावती जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या नावाने बोगस कार्डचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी नागरिकांकडून पैसेही घेतले जात आहेत. या कार्डवर ससून रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांकही देण्यात आलेला आहे. याआधारे नागरिकांची आर्थिक पिळवणुक केली जात आहे. त्यामुळे बोगस कार्डबाबत नागरीकांनी सावध रहावे. तसेच अशा खोट्या व फसव्या कार्डाच्या अमिषाला बळी पडू नये. या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८००२३३२२००/१५५३८८ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. शेळके यांनी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यFamilyपरिवार