ऐतिहासिक समूह शिल्पावर पुष्पवृष्टी; जेजुरी गडावर शिवजयंती साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:23 IST2025-02-19T19:15:07+5:302025-02-19T19:23:25+5:30
शिवशंभू मर्दानी आखाडा यांच्या शिवभक्त मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण

ऐतिहासिक समूह शिल्पावर पुष्पवृष्टी; जेजुरी गडावर शिवजयंती साजरी
जेजुरी : श्री मार्तंड देव संस्थानकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ऐतिहासिक शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे समूह शिल्पाच्या ठिकाणी महाराजांवर पुष्पवृष्टी करण्यात आली व मानवंदना देण्यात आली.
याचबरोबर श्री खंडोबा मंदिर गडकोटात कोल्हापूर येथील शिवशंभू मर्दानी आखाडा यांच्या शिवभक्त मावळ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आणि समूह शिल्पाच्या ठिकाणी ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी देव संस्थानचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, सुधीर गोडसे, पुजारी सेवेकरी वर्गाचे गणेश आगलावे, उद्योजक रवी जोशी, सुरेश उबाळे, महेश उबाळे, विठ्ठल सोनवणे, विक्रम माळवदकर, शैलेश राऊत आदी गावकरी, मानकरी उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाचे नियोजन व्यवस्थापक आशिष बाठे व अधिकारी सेवेकरी वर्गाने केले. जेजुरी परिसरात ग्रामीण भागातही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.