शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

चाळीस आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपकडून फडणवीसांचा अपमान - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 15:29 IST

मराठी अस्मितेला धक्का पोहोचविणे, महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या विरोधातील षड्यंत्र हे दिल्लीतून होते

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपशी युती हवी होती. मात्र, मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस नको होते, असे वक्तव्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. पत्रकारांनी याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामती येथे बोलताना लक्ष वेधले. त्यावर सुळे यांनी त्यांचे १०५ आमदार निवडून आले असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केले नाही? ४० आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने फडणवीस यांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

सुळे पुढे म्हणाल्या, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, १०५ आमदार असलेला राष्ट्रीय पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पवार चालवतात एवढी त्यांची ताकद आहे. हे कबूल केल्याबद्दल मी भाजप प्रदेशाध्यक्षांचे आभार मानते, असा टोला सुळे यांनी लगावला. सिलिंडरचा भाव महाग झाला आहे. कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर आला आहे. महागाई, बेरोजगारी आहे. सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे इतिहासात जाण्यात अर्थ नाही. इतिहासाचा अभ्यास कधीही करता येईल; पण आकडोंसे पेट नही भरता, जब भूख लगती है तो धान लगता आहे, हे सुषमा स्वराज यांचे वाक्य मला आठवतेय, असे ते म्हणाल्या. ज्या पद्धतीने सत्तेचा संघर्ष झाला, ज्या पद्धतीने दिल्लीच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचा घाट घातला, यातून तुम्ही काय ते बघा. महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठे षड्यंत्र केंद्र करतेय, असे सुळे म्हणाल्या.

मराठी अस्मितेला धक्का पोहोचविणे, महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या विरोधातील षड्यंत्र हे दिल्लीतून होतेय. त्यातून पहाटेच्या शपथविधीचा वारंवार उल्लेख होतो आहे. तो शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, परंतु त्यांच्या वक्तव्यातून त्यांना या शपथविधीची कल्पना होती का, हे सांगता येत नाही, मी वास्तवतेत जगते, इतिहासात नाही, असे त्या म्हणाल्या.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास ‘इलेक्शन’ मोडमध्ये आहेत. राज्यात एमपीएससी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षक आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत. परंतु, हे लोक निवडणूक आयोग, न्यायालय यासाठी व स्वत:ची खुर्ची, स्वत:ची सत्ता वाचविण्यासाठी वेळ खर्ची घालत आहेत, असे खासदार सुळे म्हणाल्या. ईडी सरकार स्वत:ची खुर्ची वाचविण्यात व्यस्त असून, ते असंवेदनशील सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही. अंगणवाडी सेविकांच्या वेदना त्यांना दिसत नाहीत, अशी टीका सुळे यांनी केली.

मराठी माणसाने काढलेला पक्ष

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी निश्चित केला होता. त्या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह अन्य नेते हजर होते. राज ठाकरे यांनी मतभेद झाल्यावर स्वत:चा वेगळा पक्ष काढला. ते चिन्ह, पक्ष ओरबाडत बसले नाहीत. तशी संधी यांनाही होती. परंतु, एका मराठी माणसाने काढलेला पक्ष दिल्लीच्या तख्ताला सहन होत नसेल, त्यातून हे घडले आहे. परंतु, अखेर सत्याचा विजय होईल, असे सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस