पुण्यात अत्यंत संतापजनक प्रकार; तरुणाला अमानुष मारहाण, शेण खाऊ घातल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

By किरण शिंदे | Updated: March 9, 2026 11:48 IST2026-03-09T11:47:41+5:302026-03-09T11:48:30+5:30

म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून काही गोरक्षकांनी चालकाला बाहेर काढत त्याला बेदम मारहाण केली. तसेच संबंधित तरुणाला शेण खाण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे

Extremely shocking incident in Pune Youth brutally beaten accused of being fed cow dung, video goes viral | पुण्यात अत्यंत संतापजनक प्रकार; तरुणाला अमानुष मारहाण, शेण खाऊ घातल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

पुण्यात अत्यंत संतापजनक प्रकार; तरुणाला अमानुष मारहाण, शेण खाऊ घातल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यात गोरक्षकांच्या नावाखाली एका ट्रक चालक तरुणाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत आंबेगाव पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून काही गोरक्षकांनी चालकाला बाहेर काढत त्याला बेदम मारहाण केली. या वेळी मारहाण करणाऱ्यांनी चालकाला धर्म आणि जातीवरून शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच मारहाणीच्या दरम्यान संबंधित तरुणाला शेण खाण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला असून हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आरोपींकडूनच चित्रीत करण्यात आला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणी बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम, हेमंत गायकवाड आणि विराज सोले अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार गणेश शेंडे यांनी या संदर्भात आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात मारहाण, शिवीगाळ तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : पुणे: युवक की बेरहमी से पिटाई, गोबर खाने पर मजबूर; वीडियो वायरल

Web Summary : पुणे में, एक ट्रक ड्राइवर को बेरहमी से पीटा गया और कथित तौर पर गौ रक्षकों द्वारा गोबर खाने के लिए मजबूर किया गया। वीडियो वायरल होने के बाद पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया, जिससे आक्रोश फैल गया और सांप्रदायिक वैमनस्य भड़काने के आरोप लगे।

Web Title : Pune: Youth Brutally Beaten, Forced to Eat Dung; Video Viral

Web Summary : In Pune, a truck driver was brutally beaten and allegedly forced to eat dung by self-proclaimed cow vigilantes. Police have registered a case against the accused after the video went viral, sparking outrage and accusations of inciting communal disharmony.