शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

मोठी कारवाई : 'केअर टेकर' बनून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांचे औरंगाबाद,जालना,नाशिक,पैठण शहरात छापे   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 20:25 IST

औरंगाबाद, जालना,नाशिक,पैठण शहरात पोलिसांचे छापे 

ठळक मुद्देसिंध सोसायटी, पंचवटीतील गुन्हे उघडकीस

पुणे : 'केअर टेकर' बनून घरात येऊन रेकी करुन रात्रीचा दरोडा टाकत ज्येष्ठ दाम्पत्याला लुटणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी औरंगाबाद, जालना, नाशिक, पैठण येथून ताब्यात घेतले. सिंध सोसायटी आणि पंचवटी येथील ज्येष्ठ दाम्पत्यांना लुटणारे दोन गुन्हे उघडकीस आण्यात चतु:श्रृंगी पोलिसांना यश आले. 

संदीप भगवान हांडे (वय २५, रा. पिंपळखेडा, औंरगाबाद), मंगेश बंडु गुंडे (वय २०, रा.वडीकाळ्या, जि. जालना), राहुल कैलास बावणे (वय २२, रा.पीर कल्याण, जालना), विक्रम दिपक थापा उर्फ बिके (वय १९, रा. विनयनगर, नाशिक), किशोर कल्याण चनघटे (वय २१, रा. औरंगाबाद), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय २५, रा. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकी, सोन्याचे, हिर्‍याचे दागिने, कॅमेरा असा साडेसतरा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संदीप, मंगेश व राहुल या तिघांनी मिळून सिंध सोसायटीतील दाम्पत्याला २५ एप्रिल रोजी १५ लाख ८० हजार रुपयांना लुटले होते. तर या सहा जणांनी ३ मार्च रोजी वृंदावन सोसायटीत एका ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले होते.

सिंध सोसायटीतील गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन, हा दरोडा संदीप हांडे व त्याच्या साथीदारांनी टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पुणे, औरंगाबाद, जालना शहरात छापे घालून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुल दिल्याचे माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, महेश भोसले, कर्मचारी दिनेश गंडाकुश,  मुकुंद तारु, प्रकाश आव्हाड, श्रीकांत वाघवले, प्रमोद शिंदे, संतोष जाधव ज्ञानेश्वर मुळे, सुधाकर माने, जारवाल यांच्या पथकाने केली. .....संदीप हांडे हा सराईत गुन्हेगार असून तो या टोळीचा प्रमुख आहे. त्याने कोथरुड येथेही एका दाम्पत्याला लुबाडले होते. त्या गुन्ह्यात त्याच्यासह तिघांना अटक करण्यात आली होती़ जामीनावर सुटल्यानंतर त्याने इतरांच्या मदतीने हे दोन्ही गुन्हे केले़ त्याने आतापर्यंत विविध शहरात १६ ते १७ नर्सिंग ब्युरोत केअर टेकर पदासाठी नोंदणी केली आहे़ त्याने पिंपरी चिंचवड परिसरातील एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवून टॉवेलने हात बांधून बाथरुममध्ये कोंडले होते. त्यानंतर घरातील सव्वा चार लाखांचा ऐवज लुटला होता. निगडी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

संदीप हांडे व त्याचा साथीदार मिथुन या दोघांनी केअर टेकर म्हणून काम करताना सिंध सोसायटीतील याच ज्येष्ठ दाम्पत्याच्या डेबिट व क्रेडिट कार्डाचा नंबर मिळवून त्याद्वारे २०१९ मध्ये एटीएममधून परस्पर पैसे काढून पावणे दोन लाखांना गंडा घातला होता. ......पुण्यात एकटे राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांची मुले बाहेर असल्याने अनेकदा त्यांची काळजी घेण्यासाठी केअर टेकरचा आधार घेतला जातो. अशावेळी केअर टेकर ठेवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नोंदणीकृत एजन्सीकडून पूर्ण खात्री केल्यानंतरच केअर टेकर घ्यावा. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त.........केअर टेकर ठेवताना घ्या काळजी* केअर टेकर ठेवताना त्याची संपूर्ण माहिती घ्यावी * केअर टेकरला अधिकची माहिती देऊ नये* केअर टेकरकडून आर्थिक व्यवहार करुन घेऊ नये * त्यांना आपल्या बँकेची गोपनीय माहिती देऊ नये * घरातील सोनेनाणे, चीजवस्तू कोठे ठेवल्या आहेत, याची माहिती देऊ नये

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसArrestअटक