शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात खुनाचे तीन कट उघड

By admin | Updated: September 18, 2016 00:59 IST

मावळच्या भूमीत रक्ताचा सडा पसरविण्याच्या तयारीत असलेल्या तीन टोळ्या मागील महिनाभरात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्या

लोणावळा : संतमहंतांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेल्या मावळच्या भूमीत रक्ताचा सडा पसरविण्याच्या तयारीत असलेल्या तीन टोळ्या मागील महिनाभरात ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. लोणावळा, तळेगाव व कामशेत येथे गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा खून करण्याचा कट या टोळ्यांनी रचला होता. सुदैवाने व पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे तिन्ही गुन्हे होण्याआधी कट उघडकीस आले. मुंबई व पुणे या दोन्ही महानगरांचा मध्यबिंदू असलेल्या मावळचा झपाट्याने विकास होत आहे. खंडाळा घाटापासून सुरू झालेला हा मावळ तालुका देहूरोडच्या सीमेवर संपतो. यामध्ये नाणे, पवन व आंदर या तीन मावळांचा, तसेच लोणावळा, तळेगाव, देहूरोड, वडगाव मावळ, कामशेत या शहरांचा प्रामुख्याने समावेश होतोे.गेल्या वर्षभरापासून मावळात सातत्याने खुनाच्या घटना, तसेच खुनाचे कट उघड होऊ लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात मावळात पाच जणांचे खून झाले. शिवाय महिनाभरात खुनाचा कट रचल्याच्या घटना एकामागून एक उघडकीस येऊ लागल्या आहेत. यावरून गुन्हेगारी मावळात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघडपणे दिसते.राष्ट्रीय महामार्गामुळे मावळाचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे जमिनीला कोटीचे भाव आले असून, तेच या गुन्हेगारीचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. मुंबई व पुणे येथील काही गुन्हेगारी टोळ्या या अर्थकारणासाठी मावळात गुन्हेगारीच्या माध्यमातून पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी याचा वर्षभरात दोनदा खुनाचा कट पोलिसांनी उधळून लावला.(वार्ताहर)>पुणे-मुंबईतील टोळ्या सक्रिय... मुंबईतील एका टोळीच्या हस्तकानेच ही सुपारी घेतली होती. मात्र, ती नेमकी कोणी दिली होती व कोणाच्या सांगण्यावरून मारण्याचा कट रचला होता, याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप अपेक्षित यश आलेले नाही. मागील महिन्यात स्वारगेट येथे त्या हस्तकाला जेरबंद करण्यात आले. दरम्यान, अनंतचतुर्थीच्या आदल्या रात्री तळेगावातील राष्ट्रवादीचे नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा कट व पेट्रोल पंपावरील दरोड्याचा प्रयत्न पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उघडकीस आणला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तिसरा प्रकार म्हणजे अनंतचतुर्थीच्या रात्री कार्ला एमटीडीसी येथे दरोड्याच्या तयारीतील एक टोळी ताब्यात घेण्यात आली. कामशेत येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत विनोद व विजय गायकवाड या दोन जणांचा खून करण्याचा कट रचण्यात आला होता. या सर्व घटना पाहिल्यानंतर मावळात पुन्हा गुन्हेगारी डोके वर काढू लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.