विदेशी ऑइल, सिडस खरेदीचा मोह पडला महागात! विकत घेऊन देतो असे सांगून सव्वा कोटींना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:45 PM2021-07-27T14:45:41+5:302021-07-27T14:45:54+5:30

सोशल मीडियावर झाली ओळख; काही दिवस चॅटिंग केल्यावर आरोपीने अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईल,सिडसला चांगली मागणी असल्याचे सांगून फसवले

Expensive to buy foreign oil, seeds! Ganda to the tune of Rs | विदेशी ऑइल, सिडस खरेदीचा मोह पडला महागात! विकत घेऊन देतो असे सांगून सव्वा कोटींना गंडा

विदेशी ऑइल, सिडस खरेदीचा मोह पडला महागात! विकत घेऊन देतो असे सांगून सव्वा कोटींना गंडा

Next
ठळक मुद्देऑईल व सिडस खरेदी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले

 पुणे : अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईलला चांगली मागणी आहे. त्या व्यवसायासाठी ऑईल व सिडस खरेदी करण्यास भाग पाडून सव्वा कोटी रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी राजू मनसुख रुपारेलिया (वय ५६, रा. ढोले पाटील रोड, बंडगार्डन) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१८ ते मे २०१९ दरम्यान घडला. सायबर पोलिसांनी मारिया, गिता शर्मा, डॉ. जेम्स विल्यम, मॉरीसन, संगीता शर्मा, पामिला राईस, ईरटीया अशी नावे सांगणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.  रुपारेलिया हे व्यावसायिक आहेत. त्यांची एका सोशल मीडियावर मारीया नावाच्या तरुणीशी ओळख झाली.

काही दिवस चॅटिंग केल्यावर तिला फिर्यादीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिने अमेरिकेत आयुर्वेदिक ऑईल,सिडसला चांगली मागणी आहे. त्याचा आपण व्यवसाय करु असे सांगितले. त्यानंतर तिने आपल्या इतर सहकार्याना संपर्क साधायला लावला. त्यांनी ब्रिटन येथून त्यांच्याशी संपर्क साधत असल्याचे भासविले. त्यामुळे त्यांना हा सर्व प्रकार खरा वाटला.

ऑईल व सिडस खरेदी करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. ते जास्त दराने विकत घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून एकूण १ कोटी २४ लाख २८ हजार ६०८ रुपये भरायला लावले. इतके पैसे भरल्यानंतरही त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. त्यानंतर त्यांनी संपर्क तोडला. त्यानंतर फिर्यादी हे त्यांना शोधण्याचा गेल्या दोन वर्ष प्रयत्न करीत होते. शेवटी ते न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी तपास करीत आहेत.

Web Title: Expensive to buy foreign oil, seeds! Ganda to the tune of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.