शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive News| टीईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 06:00 IST

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिक व महत्त्वाची कागदपत्रे अजूनही पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवली जातात....

राहुल शिंदे

पुणे: लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणा-या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra State Council Of Examination) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिक व महत्त्वाची कागदपत्रे अजूनही पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवली जातात. त्यामुळे राज्य शासनाचे परीक्षा परिषदेकडे झालेले अक्षम्य दूर्लक्ष आणि परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामास मंजूरी देण्यात आली असली तरी सुमारे चार-पाच वर्षांपासून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) , अनेक  शिष्यवृत्ती परीक्षा, टायपिंग परीक्षा, डी. एड परीक्षांसह विविध परीक्षा घेतल्या जातात. राज्यातील विविध परीक्षा केंद्रातून आलेल्या उत्तरपत्रिका परिषदेच्या गोडाऊनमध्ये जमा केल्या जातात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून परिषदेकडे गोडाऊनसाठी स्वतंत्र व मोठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे परिषदेने पत्र्याचे गोडाऊन तयार केले आहे. त्यात पेट्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ठेवल्या जातात.परिणामी लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य परिषदेने पत्र्याच्या गोडाऊनमध्ये बंद करून ठेवणे योग्य आहे का ? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

परीक्षा परिषदेने विविध परीक्षा घेऊन स्वत:च्या आर्थिक उत्पन्नात वाढ केली. त्यामुळे सुमारे 2016 मध्ये परिषदेकडे सर्व सुविधा असणारी सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी शासनाकडून कोणत्याही निधीची अपेक्षा न करता परीक्षा परिषदेने स्वत:कडील निधी तरतुद इमारतीसाठी केली. त्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरी घेण्यात आली. त्यामुळे परिषदेने भक्कम गोडाऊन न बांधता पत्र्याचे गोडाऊन बांधण्याचा निर्णय घेतला. परंतु, अद्याप बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली नाही.  

परिषदेच्या बाहेर पत्र्याच्या पेट्यांचा ढीग-परिषदेकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मुख्य कार्यालायाच्या समोरील मोकळ्या जागेत पत्र्याच्या पेट्या ठेवल्या जातात. त्यानंतर जवळच असलेल्या गोडाऊनमध्ये त्या ठेवल्या जातात. बदल्या हवामानामुळे या पेट्या पाण्यात भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पत्र्याच्या गोडाऊनमध्ये पेट्या सुरक्षित ठेवणे योग्य आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र