Pune | पुण्यातील भाजपच्या माजी पदाधिकार्‍याची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 11:32 IST2023-04-29T11:30:55+5:302023-04-29T11:32:45+5:30

वारजे एनडीए रस्त्यावर ते रहात असलेल्या इमारतीमध्ये त्यांचे कार्यालय आहे...

Ex-BJP office-bearer sanjay barate ended life in the office warje | Pune | पुण्यातील भाजपच्या माजी पदाधिकार्‍याची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

Pune | पुण्यातील भाजपच्या माजी पदाधिकार्‍याची आत्महत्या; कार्यालयातच घेतला गळफास

पुणे : भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्षाने आपल्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. वारजे एनडीए रस्त्यावर ते रहात असलेल्या इमारतीमध्ये त्यांचे कार्यालय आहे.

संजय बराटे हे कार्यालयात होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांची पत्नी कार्यालयात गेल्या. तेव्हा त्यांनी तेथील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. बराटे हे भाजपचे माजी पदाधिकारी होते. वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते. तसेच भय्यू महाराज देशमुख यांचे ते शिष्य होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजून शकले नाही. वारजे पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे़.

Web Title: Ex-BJP office-bearer sanjay barate ended life in the office warje