शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

दुर्लक्षामुळे रेबिजने दरवर्षी होतात १८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:41 AM

गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते

ठळक मुद्देऔषधोपचार असूनही मृत्यूदर चिंताजनक मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील व्यक्तींचे प्रमाण अधिक जगभरात रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू भारतातपुणे शहरात दरमहा सरासरी साडेसातशे ते आठशे जणांना कुत्रा चावल्याची नोंद

विशाल शिर्के पुणे : कुत्र्याचा चावा दुर्लक्षित करणे... झाडपाल्याचा उपयोग... ग्रामीण भागात केले जाणारे देवादिकांचे उपचार...अशा विविध कारणांमुळे चांगले औषधोपचार असूनही केवळ दुर्लक्षामुळे दरवर्षी सरासरी १८ लोकांचा मृत्यू रेबिजमुळे होत आहे. यातील ९९ टक्के मृत्यू हे ग्रामीण भागातील नागरिकांचे झाले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत ’ला दिली. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लवकर उपचार घेतल्यास रेबिजवर पूर्णपणे नियंत्रण मिळविता येते. मात्र या आजाराला तितकेसे महत्त्व दिले जात नसल्याने कुत्र्याचा चावा जीवघेणा ठरत आहे. पुणे शहरात दरमहा सरासरी साडेसातशे ते आठशे जणांना कुत्रा चावल्याची नोंद महापालिकेकडे होते. मात्र, रेबिजमुळे शहरातील नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अपवादात्मक आहे. रेबिजबाबत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती असल्याने नागरीक पूर्ण उपचार करुन घेतात. त्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरीक मात्र, त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा उपचारच घेत नाहीत. काहीवेळा उपचार अर्धवट सोडून देतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला रेबिजची लागण होते. गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते. तर या चौदा वर्षांत एकूण २५८ नागरिकांना कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष केल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, २०१९मध्येही अजअखेरीस ६ नागरिकांचा रेबिजमुळे मृत्यू झाला आहे. कुत्र्याचा चावा ही आपत्कालीन परिस्थितीसारखी बाब नसली, तरी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. ---------------------

कुत्र्याच्या पिल्लाचा चावाही जीवघेणा 

अनेकदा लहान कुत्र्याने चावा घेतला असेल तर दुर्लक्ष केले जाते. मात्र, लहान कुत्र्याचे पिल्लू रेबिज बाधित असल्यास ते लक्षात येत नाही. कारण त्याच्या वागण्यात मोठ्या कुत्र्यापेक्षा फारसे बदल दिसून येत नाही. त्यामुळे लहान कुत्र्याचा चावा देखील दुर्लक्षित करु नका, असे आवाहन अरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ----------------------

भारतात रेबिजचे सर्वाधिक बळी 

देशाात दरवर्षी रेबिजमुळे सरासरी २५ ते ३० हजार नागरिकांना प्राण गमवावे लागते. जगभरात रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. --------------------------------

रेबिजमुळे झालेले मृत्यू

२००५            १५२००६            १८२००७            २९२००८            २२२००९            १६२०१०            १५२०११            १८२०१२            २१२०१३            १९    २०१४            २२२०१५            १६२०१६            २०२०१७            १०२०१८            १७२०१९            ०६

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्य