शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

रस्त्यावरील कुत्र्यांसाठी बनलीय ती अन्नदाता ; दररोज रात्री २५ हून अधिक प्राण्यांना देते खायला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 7:39 PM

सर्व नागरिक घरांमध्ये लॉकडाऊन असताना रस्त्यांवरील प्राण्यांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्यासाठी रस्ता हेच घर असून, त्या ठिकाणी त्यांना अन्नासाठी भटकावे लागत आहे. परंतु, एक प्राणीप्रेमी मात्र रस्त्यांवरील कुत्र्यांना अन्न देत असून, त्यांची भूक भागवत आहे.

श्रीकिशन काळे

पुणे : सर्व नागरिक घरांमध्ये लॉकडाऊन असताना रस्त्यांवरील प्राण्यांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्यासाठी रस्ता हेच घर असून, त्या ठिकाणी त्यांना अन्नासाठी भटकावे लागत आहे. परंतु, एक प्राणीप्रेमी मात्र रस्त्यांवरील कुत्र्यांना अन्न देत असून, त्यांची भूक भागवत आहे. हा उपक्रम ती रात्री करत असून, दुचाकीवर फिरून स्वारगेट, मुकुंदनगर, पर्वती, सातारा रस्ता आदी भागात श्वानांना खायला घालत आहे. तिचे नाव चैत्राली संदीप मोदी असून, श्वानांची अन्नदाता बनली आहे.गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन झाल्याने नागरिक घराबाहेर येत नाहीत. मोकळेपणाने फिरता येत नाही. तसेच रस्त्यांवरील कुत्र्यांना त्यामुळे कोणीही अन्न देत नाही. परिणामी अनेक श्वान रात्री भुंकताना आढळून येत आहेत. त्यांची ही अवस्था पाहून चैत्राली ही आपल्या परिसरात तर अन्नदान करतच आहे. पण इतर शक्य त्या परिसरात जाऊन कुत्र्यांना अन्न देत आहे. ती हे काम गेली सात वर्षांपासून करीत आहे. पण आताच्या लॉकडाऊनमध्ये अधिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे तिचा परिसर सोडून इतर भागातही ती जात आहे.चैत्राली म्हणाली, मला प्राणी खूप आवडतात. माझ्या आजोबांकडून हा गुण माझ्याकडे आला आहे. माझे बाबा देखील मला या कामात खूप मदत करतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन मी अन्न देऊ शकत आहे. सात वर्षांपुर्वी मला रस्त्यावर एक जखमी कुत्रे दिसले. त्याला मी घरी आणले आणि उपचार केले. हा कुत्रा मी नंतर घरीच पाळला. त्यानंतर असे रस्त्यावर किती तरी कुत्री असतील, त्यांना अन्न मिळत नसेल किंवा मदत लागत असेल, असा विचार करून मी रात्री अन्न द्यायला सुरवात केली. रात्री वाहनांची गर्दी नसते आणि निवांत दुचाकीवर सर्वत्र जाऊन कुत्र्यांना खायला देता येते म्हणून रात्रीच मी फिरते. दररोज २५ हून अधिक कुत्र्यांना खायला देत आहे. माझ्यासोबत वीणा राठोड आणि प्रीतम पिंपळे हे देखील मला खूप मदत करतात. रात्री फिरताना पोलीसांचे खूप सहकार्य मिळते. कारण त्यांच्यामुळे मला सुरक्षित वाटते. प्रत्येकाने आपल्या शेजारील प्राण्यांना अन्न देणे आवश्यक आहे.’’माझ्या घरामागे मोकळी जागा होती. त्या ठिकाणी मी जखमी प्राण्यांना ठेवते आणि उपचार करते. माझ्याकडे एक बैल सुध्दा आहे. तो जखमी होता. त्याला घरी आणले आणि आता तो आमच्याकडेच राहतो. श्वानांना काय खायला आवडते, ते हळूहळू समजले आणि त्यानूसार मी त्यांना खायला देते. यातून मला खूप आनंद मिळतो.- चैत्राली संदीप मोदी, प्राणीप्रेमी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdogकुत्राsocial workerसमाजसेवक