'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:01 IST2025-04-29T15:00:27+5:302025-04-29T15:01:22+5:30
राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालंय ते काही बदलणार नाही, किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत

'मोठे आवाज आले तरी भीती वाटते', आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळावी; असावरीची मागणी
पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्रातील या सहा कुटुंबाना ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे.
असावरी म्हणाली, आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला सरकारमार्फत सुरक्षा मिळाली तर बर होईल अशी मागणी असावरी यांनी केली आहे. माझ्यामुळे लोकांना मदत होईल अशा ठिकाणी मला जॉबमध्ये जागा मिळायला हवी. पुणे सोडून कुठेही जाता येणार नाही. पुण्यात जॉब असावा. राजकीय लोकांनी सारखं सारखं काही वक्तव्य करू नये, ते केल्याने हे झालय ते काही बदलणार नाही. किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीत. आमचं भविष्य अंधारमय झालय. पैशांनी गोष्टी मिळतात. पण माणूस म्हणून आधार मिळत नाही. त्यांनी मानसिक आधार दिला आहे. मी सरकारचे खूप आभार मानते.
हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे - प्रगती जगदाळे
अजून आम्ही त्या धक्क्यातच आहोत, मला अजूनही व्यवस्थित झोप लागत नाही. लोक अजून आम्हाला भेटायला येत आहेत. आम्ही अजूनही त्या फायरींगच्या घटनेतच आहोत. असावरीला सरकारकडून आश्वासन मिळाली आहेत. म्हणून मी आनंदी आहे. पण आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आमची सगळ्या राजकीय लोकांना एक विनंती आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी बोलून आम्हाला मारलंय, आम्ही सगळं खर सांगितलं आहे. आमच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. त्याच राजकारण करू नका. त्यांनी गोळ्या झाडल्यावर मेंदू कसा बाहेर आला हे आम्ही बघितलं आहे. त्यामुळे माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका. त्यांनी माणुसकी म्हणून सर्वानी विचार केला पाहिजे. वक्तव्य करणं, बोलणं सोपं आहे. त्या घटनेत लहान मुलांनी जे सांगितलंय तेही खरं आहे. तुम्ही आमच्याशी वागू नका नका. आम्ही कुणीही काही खोटं बोलत नाही. तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नाही, हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं असावरीच्या आई प्रगती जगदाळे यांनी सांगितलं आहे.