शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही ‘पवारसाहेब’ अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या तंबूत- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 02:35 IST

वरिष्ठ नेते असूनदेखील शरद पवार यांना काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली. मी त्यांचा वैयक्तिकरीत्या सन्मान करतो.

बारामती : वरिष्ठ नेते असूनदेखील शरद पवार यांना काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली. मी त्यांचा वैयक्तिकरीत्या सन्मान करतो. पवार यांनी जनतेसाठी काम केले, पवार यांची चूक एवढीच होती की, त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दावा केला होता. त्यासाठी रातोरात त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. हे केवळ घराणेशाही असणाºया पक्षात होऊ शकते. मजेदार गोष्ट ही की, तरीही शरद पवार अपमानित केलेल्या काँग्रेसच्या तंबूत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावला. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथून देशासह राज्यात प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.या वेळी बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर-हवेली, खडकवासला या मतदारसंघांतून हजारो भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी एका भाजपा कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधताना पुणे जिल्ह्यात बारामती लोकसभा क्षेत्र आजपर्यंत नेतृत्व करीत आहे. मात्र, त्यांचे जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार हेच त्यांचे ध्येय असल्याचा आरोप केला.भाजपा सरकार आल्यानंतर यावर निर्बंध आले. यावर मोदी म्हणाले की, काँग्रेस संस्कृतीमध्ये वाईट बाबींचा भरणा आहे. लोकशाहीचे भाजपा पालन करते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पालखी सोहळ्यात वारकरी म्हणून सहभागी व्हावे, असे आमंत्रण मोदी यांना दिले. या वेळी भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर आदींनी या वेळी मोदींशी संवाद साधला. या वेळी कॉन्फरन्ससाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, संघटनमंत्री रवि अनासपुरे, बारामती लोकसभा प्रमुख दिलीप खैरे, चंद्रराव तावरे, वासुदेव काळे, चंद्रराव तावरे, प्रशांत सातव, सुनील सस्ते, रामचंद्र निंबाळकर, राहुल तावरे,अ‍ॅड. नितीन भामे, सुरेंद्र जेवरे, युवराज तावरे आदी उपस्थित होते.>काँग्रेसला नव्हे, काँग्रेस संस्कृतीला संपवायचेभाजपाच्या संस्कारामध्ये लोकशाही आहे. भाजपामध्ये कोणताही निर्णय एखादी व्यक्ती एका परिवारातील आहे, तिची काय इच्छा आहे. म्हणून होत नाही, तर पक्षाचे निर्णय कार्यकर्त्यांना काय वाटते, यावर निर्णय घेतले जातात. मात्र, देशात अधिक प्रमाणात घराणेशाही हाच पक्ष आहे. मात्र, भाजपाच हा एक परिवार असल्याचे असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधी यांच्या निवडीबाबत त्यांचे नाव न घेता लगावला. देशातील बहुतांश नेते काँग्रेस गोत्राचे आहेत. कारण ते काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढले, जोपासले आहेत. मी ज्यावेळी काँग्रेसमुक्त भारताची भाषा वापरतो. त्यावेळी राजकारणातून काँग्रेस संस्कृती संपवायची आहे, असा त्याचा अर्थ होत असल्याचे मोदी म्हणाले.>दौंडचे आमदार राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत. मात्र, आज बारामती लोकसभा मतदारसंघातील केवळ भाजपा कार्यकर्त्यांसाठी आयोजित कार्यक्रमात थेट उपस्थिती चर्चेची ठरली. आमदार कुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना खांद्यावर भाजपाचा गमजा घेतला होता. त्यामुळे रासपच्या आमदारांच्या खांद्यावर भाजपाचा गमजा पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.>पवारांबाबत ‘सॉफ्ट कॉर्नर’संपूर्ण संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर टीका करणे टाळले. उलट अपमान करणाºया काँग्रेसच्याच तंबूत पवार आहेत. तसेच जनतेसाठी पवार यांनी काम केल्याचे सांगत सहानुभूती दर्शविली. यापूर्वी बारामतीच्या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगत पवार यांच्यासोबतचे मैत्रीचे संबंध जाहीर केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवार