शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

उद्योजिका उषा काकडे यांना विषबाधा; काही तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 22:50 IST

दोन ते तीन तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : उद्योजिका उषा काकडे यांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या शनिवारी विविध माध्यमांवर प्रकाशित झाल्या. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र उषा काकडे यांना विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचे सांगण्यात आले. काही तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्याचेही खासगी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे या गंभीर अवस्थेत असल्याची गोपनीय माहिती पुणे पोलिसांना शनिवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वरिष्ठांनी तत्काळ माहितीबाबत खात्री करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार एक टीम सायंकाळी साडेचारच्या सुमारास काकडे यांच्या राहत्या घरी पोहोचली. काकडे अस्वस्थ अवस्थेत आढळल्या. त्यांना तत्काळ केअरटेकर व नोकरांसह वाहनात बसवून खासगी रुग्णालयात पाठविले. दोन ते तीन तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेSanjay Kakdeसंजय काकडेBJPभाजपा