शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

घोड्याच्या बेटिंगप्रकरणी 'टर्फ क्लब'ची चौकशी होणार : पुणे पोलीस आयुक्तांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 8:37 PM

घोड्याच्या बेटिंगप्रकरणी पोलिसांनी छापे टाकून केली आहे ३१ जणांना अटक

पुणे : अनधिकृतपणे घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या व खेळणाऱ्या ३१ जणांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता या प्रकरणात शहर पोलीस टर्फ क्लबमधील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. बेटिंग प्रकरणी टर्फ क्लबमधील कोणाचा समावेश आहे का तसेच तेथील कोणी या प्रकरणात मदत करत होते का या अनुषंगाने चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख उपस्थित होते.

वानवडी, कोंढवा व हडपसर परिसरात अवैध प्रकारे विनापरवाना बेकायदेशीररित्या घोड्यांचे शर्यतीवर दुसऱ्यांचे नावाचे सीमकार्ड वापरुन फोनद्वारे व ऑनलाईन सट्टा लावून जुगाराचा खेळ खेळण्याचे गैरप्रकार चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापे टाकून ३१ जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, मनिष अशोक अजवानी व मतीन कदीर खान या दोन प्रमुख बुकींचा अटक् केलेल्यांमध्ये समावेश आहे. मनिष हा प्रमुख बुकीमेकर असून तो इतर शहरातून बेटिंग घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेण्यास टफर् क्लबच्या आवारात परवानगी असते. बुकींना परवाना घेऊन त्या ठिकाणी स्टॉल टाकता येतात. पण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ॲप व मोबाईलच्या माध्यमातून बेटिंग घेतले जात होते. बेटिंग घेण्यासाठी काही कर्मचारी नेमलेले आढळून आले. त्या ठिकाणी मोठ्या स्कीन लावलेल्या होत्या. तसेच आरोपी वापरत असलेले सीमकार्ड हे दुसर्याच्या कोणाच्या तरी नावावर असल्याचे आढळले आहे. या सर्व प्रकार टर्फ क्लबच्या अधिकार्यांना माहित होता का, त्यांच्यापैकी कोणी कर्मचाऱ्यांचे यात संगनमत आहे का याचा तपास सुरु असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

बेटिंगसाठी ॲप...पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, रेसकोर्समध्ये ज्या बुकींना अधिकृत परवाना मिळालेला आहे त्यांना बेटिंग घेण्याचा अधिकार आहे. मात्र, रेस-९९९ अशासारख्या वेबसाईटच्या माध्यामूतन लाईव्ह रेस पाहून तसेच विशिष्ट अ‍ॅप विकसित करुन बेकायदेशीरपणे हे बुकी बेटिंग घेत होते. बुकींवर कारवाई करण्यात आल्यानंतर दोन दिवस ते पोलीसांना आम्ही अधिकृत असल्याचे सांगतात परंतु अद्याप एकानेही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रे सादर केलेली नाही.......... स्थानिक परिमंडळ, पोलीस ठाणे अनभिज्ञ...

ही संपूर्ण कारवाई परिमंडळ ५ च्या व वानवडी, कोंढवा, हडपसर परिसरात झाली. पोलीस आयुक्तांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी परिमंडळ ४ मधील काही अधिकारी यांना या कारवाईत सहभागी करुन घेतले. या कारवाईचा इतरांना सुगावा लागू नये, म्हणून त्यांनी चक्क परिक्षाविधीन पोलीस अधिकाऱ्यांना या कारवाईत सहभागी करुन घेतले होते. संपूर्ण कारवाई होईपर्यंत स्थानिक पोलीस ठाण्यांना यांचा सुगावा लागू दिला नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकpune race courseपुणे रेसकोर्सonlineऑनलाइन