Pune : पुणे शहरात चाकूच्या धाकाने अभियंत्याला लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 19:10 IST2023-02-25T19:08:04+5:302023-02-25T19:10:02+5:30

वारजे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...

Engineer robbed at knife point; A case has been registered against four | Pune : पुणे शहरात चाकूच्या धाकाने अभियंत्याला लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune : पुणे शहरात चाकूच्या धाकाने अभियंत्याला लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणेचाकूचा धाक दाखवून मारहाण करीत आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका २६ वर्षीय अभियंत्याला चौघांनी लुबाडले. त्याच्याजवळील रोकड, मोबाइल, स्मार्ट वॉच, असा १९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या अभियंत्याने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली असून, वारजे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अभियंता हा मूळचा बीडचा असून, तो पुण्यात नोकरी करतो. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास गावाहून आल्यानंतर तो घराकडे पायी चालत निघाला होता. यावेळी भालचंद्र दवे चौकात दुचाकीवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी अभियंत्याला अडवून चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करत ऐवज हिसकावला. हा प्रकार घडल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला होता.

अभियंत्याने चोरट्यांच्या दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवून तो पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, ती दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. दरम्यान, याप्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस उपनिरीक्षक नरेश मुंढे तपास करीत आहेत.

Web Title: Engineer robbed at knife point; A case has been registered against four