शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशानुसार रोख रक्कम स्वीकारून प्रश्न संपवा; अजित पवार यांचे भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 20:05 IST

शासनाने दिलेले पॅकेज योग्य असून, जमीने देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले...

ठळक मुद्देभामाआसखेड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पुणे : भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांच्या संमतीनेच शासनाने हेक्टरी 15 लाख रुपये रोख रक्कम देण्याचे जाहीर केले. या संदर्भात उच्च न्यायालयाने देखील शासनाने दिलेले पॅकेज योग्य असून, जमीने देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे न्यायालयात गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाढीव पॅकेज देणे शक्य नसल्याचे सांगत शासनाने जाहीर केलेल्या पॅकेज नुसार रोख रक्कम घेऊन विषय संपवून टाका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांना केले. भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवार (दि.28) रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी जमीन मिळण्यासाठी न्यायालयात गेलेल्या लोकांना पॅकेज वाढून देण्याची मागणी केली.यावर पवार यांनी कोणी तरी न्यायालयात गेले त्यांना जास्त रक्कमेचे पॅकेज दिले तर सध्या ज्या लोकांनी पॅकेज स्वीकारले त्याच्यावर अन्याय होईल. यामुळेच शासनाने जाहिर केलेल्या पॅकेज नुसार पैसे घेऊन मोकळे व्हा, असे स्पष्ट निर्देश पवार यांनी येथे दिले.------प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व एजंटांची चौकशी कराभामाआसखेड प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणाऱ्या, चुकीच्या पध्दतीने जमीन वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्याचे आदेश देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे एजंट लोकांची, जमिनीचे वाटप केलेले बाधित शेतकरी खरच त्या जमिनी कसतात का यांची देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.दिलीप मोहिते, आमदार

टॅग्स :PuneपुणेKhedखेडDamधरणAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीFarmerशेतकरी