मालकाने कामाचे आगाऊ पैसे न दिल्याने कामगाराने थेट दुकानाला लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 07:38 PM2021-12-03T19:38:03+5:302021-12-03T19:38:10+5:30

मालकाने कामाचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून कामगाराने दुकानाला आग लावल्याची घटना घडली. यामुळे आजूबाजूची दुकानांचे नुकसान झाले

As the employer did not pay in advance for the work, the worker set the shop on fire | मालकाने कामाचे आगाऊ पैसे न दिल्याने कामगाराने थेट दुकानाला लावली आग

मालकाने कामाचे आगाऊ पैसे न दिल्याने कामगाराने थेट दुकानाला लावली आग

Next

पिंपरी : मालकाने कामाचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून कामगाराने दुकानाला आग लावल्याची घटना घडली. यामुळे आजूबाजूची दुकानांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि. २) पहाटे तीन वाजता दत्त नगर, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनवणे (वय ५१, रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रकाश शंकरराव सोनकांबळे (रा. खंडरे गल्ली, ता. भालकी, जि. बिदर) असे दुकानाला आग लावणाऱ्या कामगाराचे नाव आहे. कामगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांच्या मुलाचे दत्त नगर, थेरगाव येथे ओम साई कुशन वर्क नावाचे दुकान आहे. प्रकाश दुकानात काम करत होता. त्याने मालकाकडे कामाचे आगाऊ पैसे मागितले होते. पैसे देण्यास त्यांनी नकार दिला होता. गुरुवारी पहाटे प्रकाशने दुकान आतून बंद केले आणि शिवीगाळ करत दुकानाला आग लावली.

Web Title: As the employer did not pay in advance for the work, the worker set the shop on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app