पुणे : नदीशी आपले नाते भावनिक असायला हवे. ही गोष्ट नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पूरक ठरू शकेल, असे मत जलदिंडीचे प्रवर्तक डॉ.विश्वास येवले यांनी व्यक्त केले. ‘चला, जागतिक जलदिन साजरा करू या’ या आवाहनाला प्रतिसाद देत ‘भारतीय जलसंस्कृती मंडळ’ आणि ‘रेडिओ एफटीआयआय’ या कम्युनिटी रेडिओच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जलतज्ज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमात ‘जलसंवाद’ या मासिकाच्या हिंदी प्रथमांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जलदिंडीचे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले, सिंचन खात्याचे निवृत्त सचिव विद्यानंद रानडे, जल अभियंता शरद मांडे, प्रकाश बोकिल आणि जलसंवादक डॉ. दत्ता देशकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. रेडिओ एफटीआयआय रेडिओच्या वतीने ‘समाजाच्या जलसाक्षरतेसाठी महाराष्ट्रात १६ ठिकाणी कार्यरत असलेल्या कम्युनिटी रेडिओंची सुविधा या क्षेत्रात काम करणा-या लोकांना कशी वापरता येईल' या विषयाचा आढावा सोनल इनामदार-वाडेकर यांनी घेतला. यानिमित्ताने एक लघुपटही दाखविण्यात आला. संजय चांदेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. नीता तुपारे व प्रकाश चव्हाण यांनी आभार मानले.
नद्यांशी भावनिक नाते असायला हवे : डॉ. विश्वास येवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:11 IST
नदीशी आपले नाते भावनिक असायला हवे. ही गोष्ट नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पूरक ठरू शकेल.
नद्यांशी भावनिक नाते असायला हवे : डॉ. विश्वास येवले
ठळक मुद्दे‘जलसंवाद’ या मासिकाच्या हिंदी प्रथमांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन