शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पुणे पालिकेची आपत्कालीन व्यवस्था अद्यापही ढेपाळलेलीच ; फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 13:07 IST

पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची उडाली धांदल

ठळक मुद्देपावसाळापूर्व कामाचे दाखले देण्यावर अधिकाऱ्यांचा भर

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे शहरात मंगळवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पहिल्याच पावसात पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थेची त्रेधा उडाली असून अद्यापही आपत्ती व्यवस्थापन कक्ष ढेपाळलेलाच असल्याचे दिसून आले. आपत्ती व्यवस्थापन कक्षातील फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. तर, अधिकारीही फोन घेत नसल्याचे सांगण्यात आले.गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे शहरात पूर आला होता. सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोंढवा-हडपसर, वानवडी, येरवडा, वडगाव शेरी आदी भागात पूर आला होता. सर्वाधिक नुकसान आंबील ओढा आणि त्यालगतच्या परिसराचे झाले होते. या पुरात २८ पेक्षा अधिक बळी गेले होते. यासोबतच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. नाल्याबाहेर असलेल्या रस्त्यांवरून तसेच सोसायटयांमध्ये जवळपास १२ ते १५ फुटांपर्यंत पाणी होते. अनेकांचे वाहून गेलेले संसार अद्यापही सावरलेले नाहीत. शेकडो सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या आहेत. त्या आद्यपही तशाच पडून आहेत. एकंदरीतच पावसाळ्यापूर्वी नागरिकांना दिलासा देणारे काम होऊ न शकल्याने नागरिक धास्तावलेले आहेत.त्यातच, पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हा केवळ नावापुरताच आहे की काय अशी स्थिती आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता हा कक्ष असला तरी कक्षातील फोन मात्र उचलला जात नाही. या विभागाचे अधिकारीही फोन घेत नसल्याने नागरिकांना माहिती द्यायची असल्यास अग्निशामक दल किंवा पोलिसांना फोन करावा लागतो. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाकडील १५ पथके तैनात करण्यात आल्याचे आणि त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे संजय गावडे यांनी सांगितले. व्हेईकल डेपो आणि संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून मुख्य खात्याकडून तसेच आयुक्त स्तरावरून सर्वांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आपत्ती व्यवस्थापन विभाग क्षेत्रीय कार्यालयांवर जबाबदारी टाकून मोकळे होत असल्याचे चित्र आहे.आपत्ती व्यवस्थापनची किती पथके आहेत, त्याचे नियंत्रण कोण करते आहे, पावसाळ्यात गेल्या वर्षीप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास नेमका काय 'प्लॅन' आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.------------------आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे याची माहिती दिली जाणार आहे. कोरोनासाठी असलेल्या हेल्पलाईन आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरण्यात येणारी असून स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला एकत्रित नियंत्रण कक्ष केला जाईल. यासोबतच मलवाहिन्या, नाले आणि चेंबर्सची स्वच्छता झाली आहे. जवळपास १६ हजार चेंबर्स स्वच्छ करण्यात आले आहेत. कात्रज तलावातील गाळ काढून खोलीकरण आणि बंधाऱ्यांची उंची वाढविण्यात आली आहे. आंबील ओढ्याच्या स्वच्छतेसह पावसाळापूर्व कामे ९० टक्के पूर्ण झाली आहेत.- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका-------------सगळा भार पुन्हा अग्निशामक दलावरवडगाव शेरी, येरवड, शांतीनगर, हडपसर साडे सतरानळी आदी आठ ते नऊ ठिकाणी पावसाचे पाणी शिरले. यासोबतच संध्याकाळी पाच पर्यंत शहराच्या विविध भागात झाडपडीच्या ६० पेक्षा अधिक घटना घडल्या. या सर्व कॉल्सवर अग्निशामक दलाचे जवान गेले होते. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा उचलला जात नसल्याने सर्व भार अग्निशामक दलाच्या जवानांवरच आला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसfire brigade puneपुणे अग्निशामक दलcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम