शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
5
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
6
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
7
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
8
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
9
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
10
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
11
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
12
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
13
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
14
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
15
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
16
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
17
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
18
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
19
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
20
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका

एल्गार परिषद प्रकरण : पुढील सुनावणी ६ तारखेला, पुणे पोलीस मांडणार बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 3:58 PM

एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावा मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करावीत यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआए) तपास अधिकाऱ्यांनी  पुण्यातील विशेष न्यायालयातील अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली. 

पुणे : एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत यावर येत्या ६ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे. या विषयावरील सुनावणीसाठी पुणे  विशेष न्यायालयाने सरकारी वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी येत्या गुरुवारपर्यंतचा वेळ दिला आहे. एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावा मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करावीत यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआए) तपास अधिकाऱ्यांनी  पुण्यातील विशेष न्यायालयातील अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली. 

  केंद्र सरकारने २४ जानेवारी रोजी एल्गार परिषदेचा गुन्हा एनआयएकडे हस्तांतरित केला़.  त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य शासनाला न कळविता परस्पर गुन्हा हस्तांतरित केल्याने त्याचा निषेध केला होता़.    

 २७ जानेवारी रोजी एनआयएचे पथक पुणे पोलिसांकडे येऊन त्यांना गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात द्यावीत, म्हणून पत्र दिले होते़.  मात्र, राज्य शासनाकडून अथवा पोलीस महासंचालकांकडून काहीही आदेश नसल्याने पुणे पोलिसांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला होता़. त्यानंतर एनआयएने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.nn त्यानुसार न्यायालयाने पुणे पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले होते. अजून राज्य शासनाकडून त्याबाबत काहीही माहिती पुणे पोलिसांना दिली नसल्याचे सांगण्यात येते़ होते. त्यामुळे न्यायालयात पुणे पोलीस तपास वर्ग करायला विरोध करणार की सहमती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.    पुण्यातील विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सरकारी वकील आणि बचाव पक्षास आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज सुनावणीस प्रारंभ झाल्यावर सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांनी तपास वर्ग करण्याबाबत काहीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर ही माहिती माध्यमांकडून मिळाल्याचे सांगितले. त्यांचे ते म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने त्यांना बाजू मांडण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा