अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचीही 'बोंब'; पालक व विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा नाहक मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 20:16 IST2021-07-21T20:11:36+5:302021-07-21T20:16:15+5:30

दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य मंडळाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळही बंद पडले.

The of the eleventh entry website; Parents and students once again grieve | अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचीही 'बोंब'; पालक व विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा नाहक मनस्ताप

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचीही 'बोंब'; पालक व विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा नाहक मनस्ताप

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरू केले संकेतस्थळबुधवारी सकाळपासून तांत्रिक कारणांमुळे पडले बंद

पुणे: दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य मंडळाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळही बंद पडले. त्यामुळे निकालनंतर अकरावी सीईटी प्रक्रियेतही मंडळ नापास झाले. परंतु,संकेतस्थळ बंद पडल्याने पालक व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र,एकाच वेळी लाखो विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देत असल्याने सर्व्हरवर ताण आला. परिणामी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निकालाच पाहता आला नाही. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

मात्र,आता अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरू केलेले संकेतस्थळ बुधवारी सकाळपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडले.राज्यात प्रथमच अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे १ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.राज्य मंडळाने प्रसिध्द केले हेल्पलाईन क्रमांकही बंद होते.त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला.    

राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, तांत्रिक कारणामुळे सीईटी प्रवेश अर्जाचे संकेतस्थळ बंद आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळविले जाईल. तसेच सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल. त्याचप्रमाणे हेल्पलाईन क्रमांक सुरू ठेवण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या जातील.

Web Title: The of the eleventh entry website; Parents and students once again grieve