शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

काही जणांना पक्षाचे अस्तित्व तर काहींना मुलांना प्रस्थापित करण्यासाठी निवडणुका महत्वाच्या : मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:53 IST

भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे..

 पुणे : आगामी २०१९ ची लोकसभा अन् विधानसभा निवडणुका महत्वाच्या आहेत. परंतु, काहीजणांना ही निवडणुक आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी तर काहींना स्वत:च्या मुलांना राजकीय क्षेत्रात प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्वाची वाटते आहे. भाजपासाठी मात्र या निवडणुका देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.  भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले, मागच्या सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झाला होता. कोणत्याही क्षेत्रातले निर्णयच घेतले जात नव्हते. मोदी मात्र एकही क्षण वाया न घालवता काम करत आहेत. २१ व्या शतकात भारताला व्कासपथावर नेण्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी यांनी रोवली. परंतु, त्यानंतरच्या दहा वर्षात काँग्रेस प्रणित आघाडी सरकारच्या काळात देशाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली. गेल्या पंचावन्न महिन्यांत आता मोदी यांनी पुन्हा विकासाला वेग दिला आहे. येत्या काही वर्षातच भारत अमेरिका, चीन यांना मागे टाकील अशी स्थिती आहे. ती टिकवायची असेल तर मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी शिवाजी महाराज - अफझल खान युद्धाचा दाखला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, महाराजांनी सर्व युध्द प्रसंगात शांततेने व्यूहरचना केली. आपले चौकी पहारे जागते ठेवले. खानाचे आत आलेले सगळेच्या सगळे सैन्य त्यांनी कापून काढले. मोठा विजय मिळवला. तो आजही ऐतिहासिक समजला जातो. आताची लढाईही तशीच आहे. ती तलवारीने लढायची नाही, पण मतदानाने लढायची आहे. बूथ म्हणजे चौकी, पहारे. तिथे असणारे कार्यकर्ते म्हणजे मावळे. आज काही अफजलखान नाही, मात्र त्याची प्रवृत्ती असणारे अनेकजण आहेत. त्यामुळे बूथ भक्कम ठेवा. ती खरी गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे