शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ दाम्पत्याला बसची धडक; ज्येष्ठाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:06 IST

रस्ता ओलांडताना भरधाव बसने दाम्पत्याला धडक दिल्यानंतर पतीचा अपघातात मृत्यू झाला

पुणे : भरधाव बसने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला धडक दिल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली. अपघातात पादचारी ज्येष्ठ नागरिकाचामृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

जयंत भामरे (६३, रा. ग्रीनवुड्स, मांजरी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. अपघातात भामरे यांची पत्नी वैशाली गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत भामरे यांची मुलगी प्रियांका (२८) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बस चालक संजय उज्जैनराव दिंडे (४६, रा. संतकृपा सोसायटी, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामरे दाम्पत्य शनिवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरून निघाले होते. शेवाळवाडी भाजी मंडईजवळ रस्ता ओलांडणाऱ्या भामरे दाम्पत्याला भरधाव बसने धडक दिली. अपघातात जयंत आणि त्यांची पत्नी वैशाली जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच जयंत यांचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक अशोक गांधले पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकDeathमृत्यूSenior Citizenज्येष्ठ नागरिकhusband and wifeपती- जोडीदार