शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

थोरल्या भावाने धाकट्याला धू-धू धुतले; 'कारण' ऐकून पोलिसांनी डोक्यालाच हात लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 16:03 IST

दोघे भाऊ पुण्यातील शिवणेमध्येच पण वेगवेगळे राहत आहेत.

ठळक मुद्देयाप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी थोरल्या भावाला केली अटक

पुणे : कुटुंबात भांड्याला भाडे लागणारच असे म्हटले जाते.पण अनेकदा ही भांडी इतक्या जोरात एकमेकाला लागतात आणि त्यासाठी कारणही तितकेच क्षुल्लक असते.त्यातून भांडणे थेट पोलिसांपर्यंत जातात. असाच प्रकार शिवणेमध्ये बुधवारी दुपारी झाला. कारण ऐकून कोणालाही हसु आवरल्याशिवाय राहणार नाही.

धाकट्या भावाने न विचारता आपल्या पत्नीला माहेरवरुन घेऊन आल्याचा राग अनावर झाल्याने थोरल्या भावाने पकडीने तर भावजयीने स्टीलचा खलबता मारुन जखमी तसेच त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी थोरल्या भावाला अटक केली आहे.याप्रकरणी शिवणे येथे राहणाऱ्या ३३ वर्षाच्या धाकट्या भावाने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोघे भाऊ शिवणेमध्येच पण वेगवेगळे राहत आहेत. धाकट्या भावाची पत्नी माहेरी गेली होती. थोरल्या भावाला न विचारता धाकटा आपल्या पत्नीला माहेरवरुन घेऊन आला. आपल्याला न विचारता त्याने त्याच्या पत्नीला माहेरवरुन घेऊन आल्याचे थोरल्याला समजले. तेव्हा रागाच्या भरात तो आपल्या पत्नीला घेऊन धाकट्या भावाच्या घरी बुधवारी दुपारी साडेचार वाजता आला. त्याने धाकट्याला मला न विचारता तू तुझ्या बायकोला माहेरुन का घेऊन आला, असा जाब विचारला. त्यावरुन दोघा भावांमध्ये भांडणे झाली. तेव्हा थोरल्या भावाने धाकट्याला लोखंडी पकडीने मारुन जखमी केले. त्याच्या पत्नीने आपल्या धाकट्या जावेच्या डोक्यात स्टीलचा खलबत्ता मारुन जखमी केले. धाकटा भाऊ व त्याच्या पत्नीवर उपचार करण्यात आले असून पोलिसांनी थोरला भाऊ व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. थोरल्या भावाला अटक केली असून हवालदार भोंडेकर अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक