शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कौतुकास्पद! पुणे पोलिसांच्या पुढाकाराने लॉकडाऊनमध्ये अडकलेले साडेअठरा हजार परप्रातिंय स्वगृही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 7:21 PM

पुणे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय श्रमिक, विद्यार्थी आणि नागरिक यांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया 9 मे पासून सुरू आहे.

ठळक मुद्देसोशल पोलिसिंग सेलच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, साबण वाटप

पुणे :  लॉकडाऊनमुळे शहरातच राहावे लागलेल्या तब्बल 18 हजार 537 परप्रांतीय बांधवांना पुणे पोलिसांच्या पुढाकाराने स्वगृही पाठविण्यात आले. कोरोनामुळे निर्माण झालेलया आपत्कालीन परिस्थितीत जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये पुणे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय श्रमिक, विद्यार्थी आणि नागरिक यांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया 9 मे पासून सुरू आहे. नुकतेच प्रयागराज-उत्तरप्रदेश या रेल्वेमधून 1 हजार 520 जणांना रवाना करण्यात आले. त्यात परिमंडळ 3 मधील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांचा समावेश आहे.     पुणे रेल्वे स्टेशन ते बोतिया बिहार अशा दुस-या रेल्वेची व्यवस्था करून अशा 1 हजार 452 नागरिकांना रवाना करण्यात आले. त्यामध्ये परिमंडळ, 2, 3, 4, 5 येथील नागरिकांचा समावेश होता. तिसरी रेल्वे ही पुणे स्टेशन ते मारवाड-पाली-जयपूर अशी राजस्थान येथे 1 हजार 93 नागरिकांना घेऊन रवाना झाली. आत्तापर्यंत 18 हजार 537 नागरिकांना विविध राज्यात रवाना करण्यात आले आहे. रेल्वेने प्रवास करणार्‍या नागरिकांना पोलिस ठाण्याच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून त्यांना पीएमपीएल बसमध्ये एका सीटवर एक व्यक्ती अशा पध्दतीने बसवून पुणे स्टेशन येथे आणूना त्या ठिकाणी सोशल पोलिसिंग सेलच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, साबण देण्यात आले. खाण्याच्या व्यवस्थेबरोबर त्यांची पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. यावेळी आयपीएस ऑफिसर्स वाईज ऑरगनायझेशन यांच्या वतीने श्रमिक यांची लहान मुले, वयोवृध्द यांच्या साठी दुध पॅकेट, गुळ वाटण्यात आला. पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त तथा नोडल अधिकारी सारंग आव्हाड, पुणे शहर परिमंडळ 1 ते 5 चे पोलिस उपायुक्त, विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त व संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या मदतीने ही सुविधा पुरवली.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीLabourकामगारcollegeमहाविद्यालय